About Us


                    नमस्कार


  ठाणे शहर कुणबी समाज सेवा संघाने, पंधरा वर्षांपूर्वी, वधू वर नोंदणी केंद्र व परिचय मेळाव्यांचे आयोजन सुरू केले. आजवर सहा हजारच्या वर, उपवर वधु वरांनी आपली नाव नोंदणी केली.त्यापैकी पाच हजार हुन अधिक विवाह जुळले देखील.

          वर्षातून दोन परिचय मेळाव्यांचे आयोजन केले जाते. जेथे एकाच छताखाली सुमारे 500 च्या आसपास ,विवाहोत्सुक मुले आणि मुली एकत्र येऊन, आपलं शिक्षण,नोकरी, उत्पन्न,वधू किंवा वरकडून आपल्या अपेक्षा,यांचे सादरीकरण करतात. त्यातून अनेक विवाह तिथल्यातिथे जुळतात.

          कुणबी समाजात इतक्या नीटनेटकेपणाने, शिस्तीने आणि भव्यतेने केले जाणारे आयोजन क्वचितच अन्यत्र असेल. विवाहेच्छुकांचा आणि पालकांचा उदंड प्रतिसाद या मेळाव्यात मिळत असतो. म्हणूनच हा खऱ्या अर्थाने समाजोपयोगी आणि समाजाभिमुख उपक्रम ठरला आहे.

            ही नोंदणी आजवर, प्रत्यक्ष कार्यालयात येऊन ,बायोडाटा, पत्रिका, फोटो देऊन केली जात असे. परंतु अनेक उपवर मुले-मुली देशभर आणि देशाबाहेर नोकरी व्यवसायाकरिता राहत आहेत. त्यांची गैरसोय विचारात घेऊन आणि काळाची गरज ओळखून, www.kunbimatrimonialthane.org नावाने स्वतःची "मॅट्रिमोनियल साईट" सुरू केली आहे. यापुढे आपण आपल्या घरूनच,मुलामुलींची नाव नोंदणी करू शकता किंवा स्थळे पाहू शकता.

        आजच्या पिढीची गरज आणि तंत्रज्ञानातील विकास लक्षात घेऊन, आपण ही सुविधा आजपासून समाजाकरिता सुरू करीत आहोत, खुली करीत आहोत,याचा आम्हास अपरिमित आनंद होत आहे. त्याच बरोबर जे टेक्नोसॅवी नाहीत किंवा ज्यांना सेवासंघाच्या कार्यालयात प्रत्यक्ष येऊन, वधूवरांच्या अल्बम्स, फाईल्स पाहायचे असतील, ते पूर्वीप्रमाणेच येऊन पाहू शकतात.

        नोंदणी शुल्क रुपये 1000 असणार असून, नोंदणीची मुदत (validity) एक वर्षाकरता असेल.कुणबी समाजातील विवाहेच्छुकांनी या सुविधेचा पुरेपूर लाभ घ्यावा, ही विनंती.प्रभाकर परशुराम पाटील  ( वधुवर कमिटी -  प्रमुख।   )                                                                  गुरुनाथ नथू पाटील    ( ठा. श. कुणबी समाज सेवा संघ - अध्यक्ष )
9619940017                                                                                                                        9833955958